पोस्ट्स

पोस्ट

भग्न दगडांपासून अखंड श्रद्धेपर्यंत : सोमनाथची गाथा

इमेज
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लवकरच, १३ नोव्हेंबर १९४७ रोजी तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री आणि उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल सोमनाथ येथे गेले. समुद्रकिनारी उभे राहून त्यांनी मंदिराच्या भग्नावशेषांकडे गंभीर नजरेने पाहिले आणि एक प्रतिज्ञा केली सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाची. तो क्षण म्हणजे भारताच्या सांस्कृतिक पुनर्जागरणाचा पहिला मोठा जागर; आपल्या सभ्यतेच्या स्वाभिमानाच्या सार्वजनिक पुनर्प्राप्तीचा क्षण होता. आणि आता, ११ मे रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सोमनाथ अमृत महोत्सवात उपस्थित राहून मंदिराच्या पुनर्स्थापित तेजात सहभाग घेतला, तेव्हा तीच प्रतिज्ञा पुन्हा नव्याने प्रज्वलित झाल्यासारखी वाटते. विशेष महापूजा, कुंभाभिषेक, ध्वजारोहण आणि लाखो भाविकांची उपस्थिती—हे सर्व मिळून भग्नावस्थेतून पुनर्निर्माणाकडे आणि पुनरुत्थानाकडे झालेल्या अखंड प्रवासाची घोषणा करतात. सरदार पटेलांच्या दूरदृष्टीपासून आजच्या आत्मविश्वासपूर्ण भारतापर्यंतचा हा अखंड सांस्कृतिक प्रवाह आहे. ही परंपरा, कालातीत आणि प्रेरणादायी, प्रत्येक पिढीला आपल्या वारशाचे जतन करण्याचे, ऐक्याचे रक्षण करण्याचे आणि भ...

जिल्हा परिषदेच्या १०० शाळांमध्ये वॉटर फिल्टर बसविणार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची माहिती

इमेज
नाशिक,  :- जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या बैठकीत उच्च प्राथम्य बाबींमधील १३८ कामांना मान्यता देण्यात आली आहे. त्यात जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या १०० शाळांमध्ये वॉटर फिल्टर बसविण्याच्या कामांस जिल्हा खनिज विकास प्रतिष्ठान निधीतून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यासाठी चार कोटी ५० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.  वॉटर फिल्टर बसविण्यात येणाऱ्या तालुकानिहाय शाळांची नावे अशी : चांदवड : मंगरुळ, कानमंडाळे, कुंडलगाव, भोयेगाव, पिंपळद. देवळा : वरवंडी, रामनगर, महात्मा फुलेनगर, महालपाटणे. दिंडोरी : वाघाड, भनवड, पुणेगाव, हनुमंतपाडा, कोचरगाव, चिंचखेड, जऊळके दिंडोरी, अहिवंतवाडी. कळवण : भेंडी, दळवट, नवी बेज, देवळीवणी, गणेोरे, पिंपळ खुर्द, कळवणे मुले.  पेठ : कोहोर, हातरुंडी, दोनवाडी, नाचलोंढी, हरणगाव, केजीबीव्ही पेठ. सुरगाणा : करवंदे, सराड, ठाणगाव, सूर्यगड, पळसण, मनखेड, उंबरठाण, अंबाठा, केजीबीव्ही अलंगुण. नाशिक : लाडची, सामनगाव, मातोरी, जाखोरी, विल्होळी. नांदगाव : चांदोरा, टाकळी बु., नांदूर, जातेगाव, साकोरा, नागापूर. सिन्नर...

लासलगाव येथील शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू

इमेज
नाशिक : समाज कल्याण विभागांतर्गत निफाड तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, लासलगाव येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी रिक्त जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. वसतिगृहात प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन वसतिगृहांचे गृहपाल एन. व्ही. मेधणे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, लासलगाव साठी अनु.जाती प्रवर्गासाठी शालेय रिक्त 2 जागा, वरीष्ठ महाविद्यालय रिक्त 2 जागा आहेत. अनु.जमाती प्रवर्गासाठी शाले रिक्त 1 जागा, वरीष्ठ महाविद्यालय रिक्त 1 जागा आहे. इमाव/ आ.मा.दृ. प्रवर्गासाठी वरिष्ठ महाविद्यालय रिक्त 1 जागा व विमाप्र प्रवर्गासाठी वरीष्ठ महाविद्यालय रिक्त 1 जागा, अशा एकूण 8 रिक्त जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. दिव्यांग व अनाथ यांच्यासाठी प्रत्येक प्रवर्गात समांतर आरक्षण ठेवण्यात आले आहे. वसतीगृहात विद्यार्थ्यांना चांगल्या प्रतीचे भोजन, दर महिना रूपये 1 हजार निर्वाह भत्ता, स्टेशनरी रक्कम, छत्री व गमबुट र...

दिंडोरी तालुक्यातील खुन प्रकरणी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

इमेज
दिंडोरी :- तालुक्यातील खेडले येथील खून प्रकरणातील आरोपीला जन्मठेपेची शिक्षा दिनांक १३/०५/२०२६ रोजी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयातील मा. जिल्हा न्यायाधीश श्रीमती पांढरे मॅडम (कोर्ट क्र. २) यांच्या न्यायालयाने वणी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक ३८३/२०२३, भारतीय दंड विधान (IPC) कलम ३०२, २०१, ३४ आणि भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ अन्वये दाखल खटल्याची सुनावणी पूर्ण केली. या गुन्ह्यातील आरोपी किरण शरद कदम (वय २० वर्षे, रा. कोऱ्हाटे, ता. दिंडोरी, जि. नाशिक) याच्याविरुद्ध आरोप सिद्ध झाल्याने मा. न्यायालयाने आरोपीला खालीलप्रमाणे शिक्षा सुनावली: १) भा.दं.वि. कलम ३०२ (खून) अंतर्गत: जन्मठेप आणि १०,०००/- रुपये दंड. दंड न भरल्यास ६ महिने साधी कैद. २) भा.दं.वि. कलम २०१ (पुरावा नष्ट करणे) अंतर्गत: ३ वर्षे साधी कैद आणि २,०००/- रुपये दंड. दंड न भरल्यास १ महिना साधी कैद. घटनेची पार्श्वभूमी: ही घटना दिनांक ११/०९/२०२३ रोजी रात्री ०८:०० ते ११:०० वाजेच्या सुमारास खेडले गावी, फिर्यादीच्या राहत्या घराशेजारी (ता. दिंडोरी, जि. नाशिक) घडली होती. या गुन्ह्यातील आरोपीने फिर्यादीचा मुलगा संदीप मेधणे याच...

कुंडाणे हनुमान मंदिरासमोरून मोटारसायकल चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

इमेज
नाशिक :- कळवण तालुक्यातील कुंडाणे गावातील हनुमान मंदिरासमोरून एक मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अभोणा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दत्तू हिरामण बहिरम (वय ४२, रा. दत्तनगर, ता. कळवण) यांनी आपली मोटारसायकल (क्रमांक MH 41 AR 9165, किंमत अंदाजे ३०,००० रुपये) कुंडाणे गावातील हनुमान मंदिरासमोरील एका झाडाखाली पार्क केली होती. दिनांक ३ मे २०२६ रोजी दुपारी २:०० ते ३:०० वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या संमतीशिवाय, लबाडीच्या इराद्याने ही मोटारसायकल चोरून नेली.याप्रकरणी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून अभोणा पोलीस ठाण्यात गु.र.नं. १३१/२०२६ नुसार, भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आभोणा पोलीस हवालदार (बक्कल नंबर २४६१) करत आहेत.

समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहासाठी लासलगाव येथे इमारतीची आवश्यकता

इमेज
नाशिक :-  लासलगाव, ता. निफाड येथे समाजकल्याण विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहासाठी भाडेतत्वावरील इमारतीची आवश्यकता आहे. वसतिगृहातील प्रवेशित विद्यार्थ्यांना उत्तम सोयीसुविधा मिळण्यासाठी सर्व सोयीसुविधांयुक्त (वीज, पाणी उपलब्धता असलेली) सुस्थितीतील आणि आरसीसी बांधकाम असलेली इमारत भाडेतत्वावर आवश्यक आहे.इच्छुकांनी अधिक माहितीसाठी ८९९९३९१२३७, ८९७५२७७०१८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन गृहपाल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, लासलगाव यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

जागतिक बँकेच्या प्रतिनिधींनी केली विविध विकास कामांची पाहणी

इमेज
जिल्हाधिकारी कार्यालयात ‘महास्ट्राइड’ मूल्यांकन समितीची बैठक नाशिक :- जागतिक बँक सहायित महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये विकासाला चालना देण्यासाठी संस्थात्मक क्षमता बळकटीकरण प्रकल्प (महास्ट्राइड) नाशिक जिल्हा मूल्यांकन समितीची बैठक आज आयोजित करण्यात आली होती. तत्पूर्वी जागतिक बँकेच्या प्रतिनिधींनी जिल्ह्यातील विविध विकास कामांना भेट देत पाहणी केली.  जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आज सकाळी ही बैठक झाली. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उपवनसंरक्षक राकेश सेपट, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक अभिमन्यू काशीद,  सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मुकेश ठाकूर, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. धर्माधिकारी, जागतिक बँकेच्या प्रतिनिधी स्वाती डोग्रा, सीमा व्यास, ‘महास्ट्राइडचे’ महाव्यवस्थापक दीपक देशमुख यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.  जिल्ह्यात जागतिक बँकेच्या प्रोत्साहनात्मक निधीच्या माध्यमातून होणारी विकास कामे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण होतील, अशी ग्वाही देत जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी सांगितले की, नाशिक ज...